।।श्री राम समर्थ श्री राम ।।
ओव्या:
तो देव ठाई पडेना। तरी येमयातना चुकेना।
ब्रह्मांडनायेक चोजवेना। हें बरे नव्हे।। १३।।
जेणें संसारी घातलें। आवघें ब्रह्मांड निर्माण केलें।
त्यासी नाहीं वोळखिलें " तोचि पतित ।।१४।।
मराठी अर्थ:
कारण जोपर्यंत त्याची प्राप्ती होणार नाही, तोपर्यंत यमयातना काही चुकणार नाहीत. अखिल ब्रह्मांडाच्या स्वामीला जर भेटू शकणार नसू, तर ते काही चांगले नव्हे (१३)
आपणास संसारात घालणाऱ्या, सर्व ब्रह्मांडे निर्माण करणाऱ्या परमेश्वराला जो जाणतच नसतो, तोच खरोखरीच पापी असतो. (१४)